लाइव्ह

Maharashtra Lok Sabha election Live : 'कुंकू लावायचं असेल, तर एकाचं लावा; नाहीतर...", अजित पवारांनी दिला दम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live News : महाराष्ट्रात लोकसभा २०२४ निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तीन टप्पे बाकी असून, प्रचार जोरात सुरू आहे. 

महाराष्ट्रात 48 पैकी 13 मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आता उर्वरित मतदारसंघात प्रचार सुरू आहे. मात्र, पहिल्या दोन टप्प्यात मतदान कमी झाल्याने आता मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित मतदारसंघातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दलची माहिती वाचण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अडेट्स...

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:17 PM • 28 Apr 2024

    Baramati Lok Sabha Election : 'कुंकू लावायचं असेल, तर एकाचं लावा; नाहीतर...", अजित पवारांनी दिल दम

    बारामती जिंकण्यासाठी अजित पवार पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. विविध कार्यक्रम घेत असून कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना करत आहे. जे कार्यकर्ते कुंपणावर आहेत, त्यांना आज अजित पवारांनी दम दिला. 

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. 

    अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, "जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध मी पदे दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत", असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला. 

    पुढे ते म्हणाले की, "कुंकू लावायचं असेल, तर एकाचंच लावा. माझे तरी लावा, नाहीतर त्यांचे तरी लावा; हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही मला कळते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा मला कळले होते, पण जुने पुराने उकळून काढायचे नाही असे मी ठरवले आहे", असे ते म्हणाले. 

    कार्यकर्त्यांना तंबी दिल्यानंतर अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ घेतला आणि ते म्हणाले की, "उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम द्यायला लागलेत... पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय..."

  • 04:23 PM • 28 Apr 2024

    Lok Sabha Election 2024 : महायुतीचं ठरेना! नेत्यांची धाकधूक वाढली

    महाराष्ट्रातील अखेरच्या आणि देशातील पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असली, तरी महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ संपलेलं नाही. 

    ठाणे, पालघर, नाशिक, दक्षिण मुंबई आणि कल्याण या पाच लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. 

    ठाणे लोकसभेची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पण, त्याबद्दल महायुतीतील नेत्यांनी अजूनही मौन सोडलेलं नाही. 

    कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे उमेदवार असतील, असे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले असले, तरी त्यांचे नाव पक्षाकडून अजूनही घोषित केलेले नाही. इतर जागांचा निर्णय होत नसल्याने कल्याणच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा रखडल्याचे म्हटले जात आहे. 

    नाशिकच्या जागेचाही पेच कायम आहे. या जागेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपही आग्रही आहे. सध्या इथे शिंदेंच्या शिवसेनेचे गोडसे खासदार आहेत. पण, त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

    दक्षिण मुंबईच्या जागेवरून भाजपचे राहुल नार्वेकर हे तयारीला लागले आहेत. पण, शिंदे ही जागा सोडायला तयार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे इथे शिंदे कुणाला उमेदवारी देणार, याबद्दलही उत्सुकता दिसत आहे. 

    पालघरमध्ये राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील असे सूत्रांचे म्हणणे आहे, पण ते कोणत्या चिन्हावर लढणार, हे निश्चित होत नाहीये. त्यामुळे या जागेची घोषणा रखडल्याची माहिती आहे. या जागांचा निर्णय होत नसल्याने या पाचही लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या नेत्यांचे धाकधूक वाढली आहे. 

  • 01:51 PM • 28 Apr 2024

    Baramati Lok Sabha Updates : ...तर मी पण मुख्यमंत्री झालो असतो -अजित पवार

    बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा झाली. शिर्सूफळ येथे झालेल्या सभेत बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबद्दल विधान केले.

    ते म्हणाले, "एकदा मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळत होत, २००४ ला. साहेबांनी (शरद पवार) सांगितलं, 'घ्यायचं नाही. काँग्रेसला द्यायचं.' आपण दिलं. कदाचित भुजबळ झाले असते. कदाचित आर. आर. पाटील झाले असते. जर माझ्या नशिबात असतं, तर मी पण झालो असतो. परंतू ते न घेता, काँग्रेसला दिलं. ते आपण ऐकलं. जे जे सांगितलं, ते ते ऐकलं. मी पुन्हा सांगतो. आता भावनिक होऊ नका. वडिलधाऱ्या लोकांना जरा जड अंतःकरण होतंय. माझी त्यांना विनंती आहे की, बाबानों तुमच्या काळात तरी एवढं पाणी आणता आलेलं नाही. आम्ही यात पुढे जाऊ."

  • 12:35 PM • 28 Apr 2024

    Thane Lok Sabha Updates : राजन विचारेंविरोधात शिंदे 'या' नेत्याला उतरवणार मैदानात?

    Rajan Vichare Vs Naresh Mhaske : ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत मात्र या मतदारसंघाबद्दल तिढा आहे. पण, ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

    दुसरी महत्त्वाची माहिती अशी की, ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याचेही सुत्रांनी सांगितले. 

    ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक आणि रविंद्र फाटक यांचंही नाव होतं चर्चेत होतं. यात एक नाव ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचंही आहे. मात्र, ठाण्यातील मूळ शिवसैनिक असल्याने स्थानिक शिवसैनिकांकडून नरेश म्हस्के यांच्या नावाला पसंती दिली गेली, अशी माहिती आहे. 

    मागच्या दोन दिवसांच्या बैठका आणि चाचपणीनंतर नरेश म्हस्के यांच्या नावावर आता एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. यावेळी काही नावांमध्ये बदल होण्याचीही  शक्यता आहे.

  • ADVERTISEMENT

  • 11:40 AM • 28 Apr 2024

    Madha Lok Sabha Updates : 'अजित पवार कोब्रा, तर मी मुंगूस', जानकरांनी केले गंभीर आरोप

    अजित पवार गटाकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे. ते म्हणाले की, "अजित पवार कोब्रा आहे. कुणाला डसल्यावर सोडत नाही, पण मी मुंगसासारखा चिवट आहे. अजित पवारांना एवढंच सांगणं आहे की, तुमच्या लोकांना थांबवा. कारण ४ जूनला विजय मुंगसाचा होणार की कोब्राचा हे दिसणार आहे. समजा कोब्रा डसलाच तर शरद पवारांसारखा आधारवड आमच्या पाठीमागे आहे, असे जानकर म्हणाले. 

  • 11:26 AM • 28 Apr 2024

    Lok Sabha election Delhi : दिल्लीच्या अध्यक्षांनी काँग्रेसला दिला झटका

    लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच काँग्रेसला झटका बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली काँग्रेसचे प्रभारी महासचिव दीपक बाबरिया यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे लवली यांनी काँग्रेस सोडल्याचे म्हटले जात आहे.

  • ADVERTISEMENT

  • 10:05 AM • 28 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : मोदींची उडवली खिल्ली, फडणवीस-अजित पवारांवर गंभीर आरोप

    पुण्यात माध्यमांशी उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवरून संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला. त्याचबरोबर एक अकेला सब पे भारीवरून मोदींची खिल्ली उडवली. 

    राऊत म्हणाले, "काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसे काल उत्तर मध्य मुंबई... सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना दिली. महाराष्ट्रात आम्ही ३०-३५ जागा याक्षणी जिंकतोय. कुणी कितीही मोठंमोठ्या घोषणा करू द्या."

    "जिंकण्याची एवढीच खात्री असेल, तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कुणाला देताहेत? काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आली. युतीचे काम करा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकू. तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना... एक अकेला सब पे भारी... नरेंद्र मोदी... मग धमक्या कशाला देता आहात? लोकशाही आहे ना... लोकांना ठरवू द्या ना?", असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

    "बारामीत, शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार जाहीरपणे धमक्या देताहेत. व्यापारी, उद्योजक हे सगळे काम करणारे लोक आहे. त्यांना नोटीसा... त्यांना बोलवून धमक्या... त्यांना सांगायचं माझ्या पत्नीचे काम करा. नाहीतर पन्नास कोटी भरावे लागतील. या धमक्या कशाकरिता?", असे राऊत म्हणाले.

  • 09:42 AM • 28 Apr 2024

    North Central Mumbai Lok Sabha : भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

    उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांची सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी हुकली. भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट कापत या मतदारसंघातून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. पक्षाकडून निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पूनम महाजन यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

    "उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची १० वर्ष सेवा करण्याचीस संधी दिल्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार. एक खासदार म्हणूनच नव्हे, तर मुलीसारखं प्रेम दिल्यावर मतदारसंघातील कुटुंब समान जनतेची मी सदैव ऋणी राहीन आणि हीच आशा करते की, हे नाते कायम राहावं."

    पूनम महाजन यांनी यावेळी प्रमोद महाजन यांचेही स्मरण केले. त्या म्हणतात, "माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मला 'राष्ट्र प्रथम, नंतर आपण'चा जो मार्ग दाखवला, मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करते की, आजीवन त्याच मार्गावर चालू शकेल. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र", अशा भावना पूनम महाजन यांनी मांडल्या आहेत. 

follow whatsapp

ADVERTISEMENT