घटस्फोटानंतर पतीने घरातील मांजरीसाठीही दिली पोटगी, तीन महिन्याला 10 हजार रुपये मोजणार; नेमकं प्रकरण काय?

Alimony For Cats : घटस्फोटानंतर पतीने घरातील मांजरीसाठीही दिली पोटगी, तीन महिन्याला 10 हजार रुपये मोजणार; नेमकं प्रकरण काय?

Alimony For Cats

Alimony For Cats

मुंबई तक

02 Nov 2025 (अपडेटेड: 02 Nov 2025, 02:41 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

घटस्फोटानंतर पतीने घरातील मांजरीसाठीही दिली पोटगी

point

तीन महिन्याला 10 हजार रुपये मोजणार; नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

Alimony For Cats : तुर्कीमध्ये एका घटस्फोटित जोडप्याने आपल्या पाळीव प्राण्यांसाठी घेतलेला निर्णय सध्या चर्चेत आहे. इस्तंबूलमध्ये राहणारे बुगरा बी. आणि एझगी बी. या जोडप्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला असला, तरी त्यांनी त्यांच्या मांजरींबाबत घेतलेली जबाबदारी समाजात एक वेगळेचं उदाहरण घालून देणारी ठरली आहे.

केवळ कस्टडी देऊन त्यांनी हात झटकले नाहीत, पोटगीही देणार

घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी मिळून एक अनोखी अट आपल्या कायदेशीर करारात समाविष्ट केली. या अटीनुसार, पती बुगरा बी. यांनी त्यांच्या दोन मांजरींची कस्टडी पूर्णपणे घटस्फोटीत पत्नी एझगी बी. हिच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ कस्टडी देऊन त्यांनी हात झटकले नाहीत, तर त्या मांजरींच्या काळजीसाठी दर तीन महिन्यांनी 10,000 तुकीं लिरा एझगीला देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

हेही वाचा : 'धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..', 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

या निर्णयामुळे दोघांमधील परस्पर आदर आणि जबाबदारीची जाणीव स्पष्ट दिसून येते. पाळीव प्राण्यांना कुटुंबाचा सदस्य मानणाऱ्या या जोडप्याने घटस्फोटानंतरही त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी नाकारली नाही. बुगरा बी. यांनी सांगितले की, "आमचं वैवाहिक नातं संपलं असलं तरी या मांजरी आमच्यासाठी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहेत. त्यांची काळजी घेणं ही माझीही जबाबदारी आहे." एझगी बी. हिनेही या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, "घटस्फोटानंतरही आमच्या मांजरींचं आयुष्य पूर्वीसारखंच राहावं, यासाठी आम्ही ही अट घातली. त्या दोघींनी कोणताही बदल जाणवू नये, हेच आमचं उद्दिष्ट आहे."

तुर्कीमध्ये या घटनेची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी या जोडप्याच्या संवेदनशीलतेचं आणि प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमाचं कौतुक केलं आहे. काहींनी असे मत मांडले की, मानवी नात्यांमध्ये मतभेद झाले तरी पाळीव प्राण्यांवरील प्रेम टिकवून ठेवता येऊ शकतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. बुगरा आणि एझगी यांनी घेतलेला हा निर्णय केवळ कायदेशीर दस्तऐवजातली अट नाही, तर प्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलतेचा एक सुंदर नमुना ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तिघी मैत्रिणी गावातून एकत्र झाल्या गायब! 'त्या' बहाण्याने घराबाहेर पडल्या अन्... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा...

    follow whatsapp