बीड : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांना नागपूर कारागृहाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या अनेक वादग्रस्त घटनांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
कैद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा पेट्रस गायकवाड यांच्यावर आरोप
पेट्रस गायकवाड यांच्या कार्यकाळात बीड कारागृहात बेकायदेशीर कृत्यांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. कारागृहाच्या आत मोबाईल फोन आणि गांजा आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर या घटनेवरूनच गायकवाड यांच्यावर कैद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या सर्व घडामोडींनंतर प्रकरणाने राजकीय रंग घेतला होता.
हेही वाचा : VIDEO : फटाका स्टॉलचं हटके प्रमोशन रील स्टारच्या अंगलट, पोलिसांनी उचलल्यानंतर म्हणाला, 'वाकड पोलीस जिंदाबाद'
गोपीचंद पडळकर यांनी केली होती देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार
राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी गायकवाड यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली होती. त्यानंतर बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेतूनही पडळकर यांनी अधीक्षक गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली होती.
सतत वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने आज सकाळीच गायकवाड यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यांना नागपूर कारागृहात नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. बीड कारागृहातील वादग्रस्त प्रकरणांमुळे ही बदली आवश्यक असल्याचे कारागृह विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गायकवाड यांच्या जागी आता नवीन अधीक्षक कोण येणार, आणि बीड कारागृहातील अनुशासन पुन्हा कसे प्रस्थापित केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी कोणते आरोप केले होते?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनी असा दावा केला होता की, बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे प्रयत्न सुरू असून, कारागृहातील महापुरुषांचे फोटो काढून त्यांच्या जागी बायबलमधील श्लोक लिहिले जात आहेत. या प्रकरणानंतर कारागृहातील कैद्यांवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आणि त्यांना मानसिक तसेच शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे आरोप कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केले. त्यानंतर जामिनावर सुटलेल्या एका कैद्यानेही कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराशी संबंधित गंभीर आरोप केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप
ADVERTISEMENT











