Government Jobs : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने वॉचमन कम गार्डनर, ऑफिस असिस्टंट, कौन्सिलर एफएलसी (भोपाळ रायसेन) आणि अटेंडर/सब स्टाफ या पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या संदर्भातील सविस्तर अधिसूचना बँकेच्या centralbank.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सबमिट करण्यासाठी शेवटची तारीख 4 जून ही देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये 7 वी उत्तीर्ण, 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर किमान वय 22 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षे असणारे उमेदवार या पदांसाठी पात्र ठरतील. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील (जनरल, ओबीसी, एससी, एसटी) उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नसून ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
हे ही वाचा : नर्सचा मर्डर करुन बॉडी रुग्णालयात आणून टाकली, सुफियानच्या एका हट्टामुळे भयंकर घडलं!
किती वेतन मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाईल आणि त्यांना दरमहा 12,000 रुपयांपासून 25,000 रुपयांपर्यंत उत्तम वेतनमान मिळेल. यामध्ये वॉचमन कम गार्डनर पदासाठी दरमहा 12,000 रुपये आणि भत्ते, ऑफिस असिस्टंट पदासाठी 20,000 रुपये आणि भत्ते, तर अटेंडर/सब स्टाफ पदासाठी 14,000 रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाईल. तसेच कौन्सिलर एफएलसी (भोपाळ रायसेन) पदासाठी दरमहा 25,000 रुपये प्रतिमहिना दिले जातील.
हे ही वाचा : प्रशिक्षकाने खोलीत बोलावलं अन्.., 17 वर्षीय बॉक्सरसोबत काय घडलं?
'असा' करा अर्ज
या भरती प्रक्रियेत एकूण जागांची संख्या अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही, परंतु पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑफलाइन असल्याने, उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज अंतिम मुदतीपूर्वी म्हणजेच 4 जून पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवणे अनिवार्य आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्यामुळे वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी centralbank.bank.in या वेबसाईटला भेट द्या.
ADVERTISEMENT











