मुंबईची खबर : 'या' भागात लवकरच सुरु होणार मेट्रो, कसा आहे प्लॅन?

चेंबूर ते मंडाळे दरम्यानचा हा प्रवास आता कोणत्याही वाहतूक कोंडीविना अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार असल्याने स्थानिक प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

24 May 2026 (अपडेटेड: 24 May 2026, 03:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : 'या' भागात लवकरच सुरु होणार मेट्रो

point

प्रवासाच्या वेळेत 50 टक्क्यांची बचत

Mumbai News : मुंबईच्या पूर्व उपनगरांनी नेहमीच शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी गती दिली आहे. आता या उपनगरांमधील नागरिकांच्या प्रवासाला अधिक वेग देण्यासाठी हक्काची आणि आधुनिक मेट्रो सेवा सज्ज झाली आहे. देशभक्त ना. ग. आचार्य उद्यान (डायमंड गार्डन) ते महाराष्ट्र नगर-मंडाळे दरम्यानचा मेट्रोचा नवा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून, यामुळे पूर्व उपनगरांच्या दळणवळणाला एक नवी आणि वेगवान दिशा मिळणार आहे.

हे वाचलं का?

काही मिनिटांमध्येच पूर्ण होणार प्रवास

हा नवा मेट्रो मार्ग एकूण 5.53 किलोमीटर अंतराचा असून यामध्ये 5 अत्यंत महत्त्वाची स्थानके समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये देशभक्त ना. ग. आचार्य उद्यान (डायमंड गार्डन), श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार, मानखुर्द आणि महाराष्ट्र नगर-मंडाळे या स्थानकांचा समावेश आहे. चेंबूर ते मंडाळे दरम्यानचा हा प्रवास आता कोणत्याही वाहतूक कोंडीविना अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार असल्याने स्थानिक प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : सातवी उत्तीर्णांना राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीची संधी, कसा कराल अर्ज?

प्रवास अधिक सुखकर

मेट्रो मार्गिका 2ब ही मुंबईतील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागांना थेट जोडते. हा संपूर्ण मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ आणि मजबूत होणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत तब्बल 50 ते 75 टक्क्यांची मोठी बचत होईल. विशेष म्हणजे, ही मार्गिका इतर 4 महत्त्वाच्या मेट्रो मार्गिका, मोनोरेल तसेच पश्चिम व मध्य रेल्वे नेटवर्कशी सहज जोडली जाणार असल्याने मुंबईकरांचा एकूणच प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

हे ही वाचा : विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोल ओतून जाळलं, एवढ्यावर न थांबता..

इंधन बचतीचा मार्ग

एमएमआरडीए (MMRDA) आणि महा मुंबई मेट्रोच्या या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. मेट्रोचा हा वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास म्हणजे इंधनाची बचत करणारा ठरत आहे. आज मेट्रोचा पर्याय निवडणारा प्रत्येक प्रवासी केवळ स्वतःचा प्रवास सोपा करत नसून, देशाचे इंधन वाचवून भारताच्या हरित वाहतूक क्रांतीमध्ये आपले मोलाचे योगदान देत असल्याचे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.