Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय स्पर्धा आयोगात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्पर्धा आयोग (CCI) कडून यंग प्रोफेशनल पदावरील भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. कायदा, अर्थशास्त्र किंवा आयटी क्षेत्रात यंग प्रोफेशनल म्हणून काम करू इच्छिणारे उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 1 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
1. यंग प्रोफेशनल लॉ (कायदा) क्षेत्रात अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून कायद्याची पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांकडे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि इतर कोणत्याही कोर्टात काम करण्याचा अनुभव असणं गरजेचं आहे.
2. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात यंग प्रोफेशनल म्हणून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे इकोनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्रात पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएशन) ची डिग्री असणं अनिवार्य आहे. तसेच, यासोबतच, उमेदवारांना अर्थशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात कार्याचा अनुभव असणं गरजेचं आहे.
3. CCI मध्ये आयटी जॉबसाठी यंग प्रोफेशनल म्हणून नोकरी करण्यासाठी, उमेदवारांकडे टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग किंवा कंप्यूटर टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, त्यांना संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव देखील असणे गरजेचं आहे.
हे ही वाचा: 27 दिवसांच्या नवजात बाळाची हत्या अन् पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला... महिलेने का केलं 'असं' निर्घृण कृत्य?
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
वेतन
सरकारी नियमांनुसार, यंग प्रोफेशनल पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000 रुपये वेतन दिलं जाईल.
हे ही वाचा: घटस्फोटानंतर पतीने घरातील मांजरीसाठीही दिली पोटगी, तीन महिन्याला 10 हजार रुपये मोजणार; नेमकं प्रकरण काय?
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये उमेदवारांना केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज भरावा लागेल.
2. यंग प्रोफेशनलच्या संबंधित पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम CCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
3. त्यानंतर, वेबसाईटच्या होमपेजवर जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
4. लिंकवर क्लिक केल्यानंतर लक्षपूर्वक आवश्यक माहिती माहिती भरा.
5. आता, मागितलेल्या डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा.
6. शेवटी भरलेला अर्ज तपासून फॉर्म सबमिट करून घ्या.
7. भविष्यासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT











