सातारा : जेवणानंतर घेतला आयुर्वेदिक काढा अन् बाप-लेकाचा गेला जीव

हणमंतराव पोतेकर व त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय 32 ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक काढा घेतला.

Satara : father and son died while treatment in phaltan

Satara : father and son died while treatment in phaltan

मुंबई तक

13 Jul 2023 (अपडेटेड: 13 Jul 2023, 07:53 AM)

follow google news

सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पितापुत्राचा मृत्यूमुळे फटलणमध्ये खळबळ उडाली आहे. काढा घेतल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

हणमंतराव पोतेकर व अमित पोतेकर अशी मृत्यू झालेल्या पितापुत्राची नावे आहेत. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित, मुलगी या तिघांना त्रास जाणवू लागला. रात्रीत तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पितापुत्राचा मृत्यू झाला.

हणमंतराव रामभाऊ पोतेकर (वय 55) हे त्यांच्या कुटुंबासोबत फलटण शहरातील गजानन चौक येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, हणमंतराव पोतेकर व त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय 32 ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक काढा घेतला.

वाचा >> आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना

काढा पिल्यानंतर ते झोपी गेले. पण, मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित, मुलगी अशा तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना रात्रीच शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

वाचा >> Seema Haider: प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे ‘हे’ व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? पतीसोबत…

दरम्यान, तिघांवर उपचार सुरू असतानाच पहाटे हणमंतराव पोतेकर व त्यानंतर पंधरा मिनिटांनी मुलगा अमित पोतेकर यांचे निधन झाले.

वाचा >> Crime: ऑफिसमध्ये रक्ताचा सडा! बॉसची तलवारीचे वार करत हत्या

हणमंतराव पोतेकर यांच्या मुलीची तब्येत सुधारली असून, या पितापुत्राचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याचे कारण समजू शकलेले नाही. विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या पितापुत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

    follow whatsapp