Crime News: दिल्लीतील नोएडामध्ये राहणाऱ्या एका महिलेवर तिच्या पतीच्या उपचाराचं कारण सांगून शारीरिक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला असल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. पीडितेने एका मांत्रिकावर बळजबरीने शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. पीडितेने प्रकरणासंदर्भात सेक्टर-39 मध्ये तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आरोपीवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
मानसिक आजाराने ग्रस्त
प्रकरणातील पीडित महिला मुळची पश्चिम बंगालची रहिवासी असून सध्या ती नोएडामधील एका गावात भाड्याच्या घरात राहते. महिलेचा पती हा मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर बरेच उपचार करण्यात आले. बरेच उपाय करून देखील त्याच्या मानसिक आरोग्यात काहीच सुधार होत नव्हता.
एका मांत्रिकाची माहिती
पीडितेला सेक्टर-97 मधील धार्मिक स्थळी असलेल्या एका मांत्रिकाबद्दल माहिती मिळाली. तो मांत्रिक भूतबाधा दूर करुन सर्व अडचणी ठिक करत असल्याचं एका व्यक्तीने त्या महिलेला सांगितलं.
हे ही वाचा: समलैंगिक डेटिंग अॅपवर ओळख झाली..पहिल्याच भेटीत केले शारीरिक संबंध, तरुणासोबत नंतर घडलं भयंकर!
शारीरिक संबंधासाठी दबाव
त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून पीडित महिला त्या ठिकाणी मांत्रिकाला भेटायला गेली. महिलेने मांत्रिकाला तिच्या सर्व समस्या सांगितल्या. मात्र, त्यावेळी त्याने महिलेवर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा दबाव टाकला. महिलेसोबत संबंध बनवण्यासाठी आरोपीने तिला बरेच आमिष दाखवले. त्यावेळी महिलेने त्याच्या बोलण्याला बळी न पडता जोरात ओरडून लोकांना घटनास्थळी बोलवलं.
हे ही वाचा: वहिनीला हवे होते दिरासोबत सलग अनैतिक संबंध, बाईने पतीला दिला शॉक अन्...
यादरम्यान, या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ देखील काढण्यात आला. पीडित महिला त्या मांत्रिकाला तिच्या सगळ्या समस्या सांगताना दिसत आहे. त्यामध्ये आरोपी देखील दिसत आहे. त्यावेळी पीडित महिलेसोबत तिची मुलगी सुद्धा मांत्रिकाकडे गेली होती. या सगळ्या प्रकरणाचा योग्य रितीने तपास करून कारवाई केली जाणार असल्याचं सेक्टर 39 पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
