दाजी, मेहुणी अन् जंगलात सापडला 'तो' मृतदेह... 50 हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या! मर्डर मिस्ट्री वाचून थक्कच व्हाल

एका घनदाट जंगलात पोलिसांना दगडाखाली एक मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा करण्यात आला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

दाजी, मेहुणी अन् जंगलात सापडला 'तो' मृतदेह...

दाजी, मेहुणी अन् जंगलात सापडला 'तो' मृतदेह...

मुंबई तक

• 11:37 AM • 02 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दाजी, मेहुणी अन् जंगलात सापडला 'तो' मृतदेह...

point

50 हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या!

point

मर्डर मिस्ट्री वाचून थक्कच व्हाल

Crime News: एका घनदाट जंगलात पोलिसांना दगडाखाली एक मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. खरं तर, तो मृतदेह चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सृजन साहू नावाच्या तरुणाचा होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा करण्यात आला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

संबंधित प्रकरण हे मध्य प्रदेशातील नरसिंहपुर परिसरातील असल्याची माहिती आहे. येथे राहणारा एक 35 वर्षीय सृजन साहू नावाचा तरुण 25 ऑक्टोबर रोजी घरातून बाहेर पडला होता. बाहेर काहीतरी काम असल्याचं सांगून तो घरातून बाहेर पडला मात्र, त्यानंतर तो घरीच परतलाच नाही. 

सीसीटीव्ही मध्ये चुलत मेहुणीसोबत दिसला...

दुसऱ्याच दिवशी, सृजनच्या कुटुंबियांनी मंगवानी पोलीस स्टेशनमध्ये आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सृजनच्या मोबाईलचे शेवटचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर, त्यांना शहराबाहेर हायवे 44 वरील एका रेस्टॉरंटजवळ सिग्नल आढळलं. या रेस्टॉरंटचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सृजन एक तरुणी आणि एका मुलासोबत दिसला. दोघांनी आपला चेहरा कापडाने झाकला होता. तिघे सुद्धा मारुती कारमधून हॉटेलमध्ये आले होते. तपासादरम्यान, काही तासांतच पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या तरुणीची ओळख पटवली, ती तरुणी सृजनची चुलत मेहुणी निधी साहू असल्याचं समोर आलं. 

हे ही वाचा: ठाणे: आईने पोटच्या मुलीला बळजबरीने वृद्ध NRI कडे पाठवलं! मुलीच्या बदल्यात दरमहा 2.5 लाख रुपये...

आरोपींना ताब्यात घेतलं अन् गुन्हा कबूल...

तसेच, तिच्यासोबत असलेल्या तरुणाचं नाव साहिल असून तिघांचं लोकेशन शहरापासून जवळपास 40 किमी दूर अंतरावरील मंगवानीच्या जंगलात आढळलं. त्याच ठिकाणी सृजनचा मोबाईल बंद झाला होता. पोलिसांनी निधी आणि साहिलला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. सुरूवातीला, दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण, अखेर आरोपींनी सृजनची हत्या करून त्याचा मृत्यू दगडाखाली लपवल्याचं कबूल केलं.

हे ही वाचा: 'धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..', 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

प्रेमसंबंधातून केली निर्घृण हत्या 

खरं तर, सृजन आणि निधीचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, सृजनने कुटुंबियांच्या दबावामुळे निधीच्या चुलत बहिणीसोबत लग्न केलं. त्यानंतर, निधीचं सुद्धा दुसऱ्या तरुणासोबत लग्न झालं. मात्र, लग्नानंतर सृजनने निधीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. सृजनजवळ निधीचे काही प्रायव्हेट फोटो असल्यामुळे तो त्या फोटोंच्या आधारे धमकवायचा. या सगळ्याला वैतागून निधीने सृजनच्या हत्येचा कट रचला. तिने तिच्या ओळखीच्या साहिल नावाच्या तरुणाच्या सृजनच्या हत्येसाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली. 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी निधीने सृजनला भेटण्यासाठी बोलवलं. त्यावेळी, तिघांनी पीडित तरुणाला कारमध्ये बसवलं आणि गाडी जंगलात नेली. कार जंगलाच्या आत पोहोचताच निधीने सृजनच्या गळ्यावर चाकूने वार केले. साहिल आणि त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने सुद्धा सृजनवर वार केले आणि या गंभीर हल्ल्यात सृजनचा मृत्यू झाला. त्यानंतर, तिघांनी मृतदेह दगडाखाली लपवला आणि तिथून ते फरार झाले. 

    follow whatsapp