Crime News : उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रामनगर पोलीस ठाणे परिसरात महिलेनं तिच्या प्रियकरासोबत कट रचून वर्षाच्या मुलाची कथितरित्या हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला तिचा प्रियकर फैजान आणि साथीदार रशीदला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर फैजानच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या पायात गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : शुक्र आणि केतूच्या युतीने 'या' राशींच्या अडचणीत वाढ होणार
महिलेचे तरुणाशी जुळले सूत
पोलिसांच्या माहितीनुसार, रामनगरमधील मच्छरहट्टा येथे राहणाऱ्या सोना शर्मा यांनी दोन वर्षांपूर्वी एका अपघातात आपल्या पतीला गमावले होते. ती आपला मुलगा सूरज (वय 10) आणि 5 वर्षाच्या मुलीसोबत राहत होती. पोलिसांनी या प्रकरणी सांगितलं की, याच काळात त्यांचे गोलाघाट येथे राहणाऱ्या आणि त्यांच्या घरी येणाऱ्या फैजानशी प्रेमसंबंध जुळले होते.
लेकराने आईला आणि फैजानला नको त्या अवस्थेत पकडलं
या प्रकरणी अतिरिक्त पोलीस उपायुक्त टी. सरवनन म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी, सूरजने त्याच्या आईला आणि फैजानला त्यांच्या बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. मुलगा गुपित उघड करेल या भीतीने ती महिला आणि तिचा प्रियकर घाबरले. नंतर फैजानने मुलाला ठार मारण्याचा कट रचला. ते पुढे म्हणाले, सोमवारी सायंकाळी, फैजानने सूरजला बावन बिघा मैदानात झुडपांत बोलावण्यात आले. तिथे, त्याने त्याचा मित्र राशीदच्या मदतीने, कथितरित्या मुलाचा गळा चिरून तिचा खून केला आणि मृतदेह लपवण्यात आला.
गुन्हा लपवण्याचा प्रयत्नातून महिलेनं पहाटेच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत त्यांनी दावा केला की, आपल्या मुलाचं अपहरण करण्यात आलं. मंगळवारी रात्री पोलिसांनी बावन बीघा येथील झुडूपांमधून सूरजचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. नंतर आईवर संशय बळावला गेला, ती वारंवार फैजानचे नाव घेत असल्याचे ऐकू आले. पोलिसांनी तात्काळपणे फैजान आणि रशीदला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोल ओतून जाळलं, एवढ्यावर न थांबता..
चौकशीदरम्यान, पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिराने फैजानला घटनास्थळी नेले. त्याने एका पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावून घेत, पथकावर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला असता, त्याच्या उजव्या पायातच गोळी लागली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आईने आणि तिच्या प्रियकराने हा कट रचून त्याची हत्या केली. या प्रकरणी आरोपींना पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











