Crime News : महिलांच्या कंबरेवर कात्रीने वार करून त्यांना जखमी करणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी शनिवारी (23 मे) अटक केली आहे. दोन तरुणींनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता, आणखी तीन पीडित महिला समोर आल्या. अंकित वर्मा (वय 26) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो एका नामांकित कंपनीत अकाऊटंट म्हणून कार्यरत आहे. महिलांविषयी द्वेष असल्यामुळे आणि अशा कृत्यातून विकृत आनंद मिळत असल्यामुळे आपण हे हल्ले केल्याची धक्कादायक कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-56 परिसरात गुरुवारी संध्याकाळी ऑफिसवरून पायी घरी परतणाऱ्या दोन नोकरदार तरुणींवर एका पांढऱ्या टी-शर्ट घातलेल्या स्कूटीस्वाराने मागून येऊन टोकदार वस्तूने हल्ला केला. अवघ्या 10 मिनिटांच्या अंतराने या दोन्ही घटना घडल्या. पोलिसांनी जखमी तरुणींना तातडीने रुग्णालयात दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने स्कूटीचा नंबर शोधून काढत पोलिसांनी गाझियाबादच्या खोडा कॉलनीतून आरोपी अंकित वर्माला बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा : घर जावयाचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध, सासूला कळालं अन् भयंकर घडलं
रस्त्यात सापडली कात्री
अंकितच्या अटकेची बातमी समजताच त्याचे कुटुंबिय आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तो घरात आई-वडील आणि पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या या विकृत मानसिकतेबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, आठवड्यापूर्वी त्याला रस्त्यावर पितळेच्या कात्रीचा अर्धा तुटलेला भाग सापडला होता, जो त्याने आपल्या बॅगेत ठेवला. ऑफिस सुटल्यानंतर हातात कात्री घेऊन तो स्कूटीवरून निघायचा आणि वाटेत संधी मिळताच महिलांवर पाठीमागून हल्ला करायचा.
हे ही वाचा : चुलत बहीण सतत 'तो' सल्ला द्यायची, भावाच्या डोक्यात तिडीक गेली, भयंकर प्रकरण!
पोलिसांनी झडती घेतली अन्..
आरोपीच्या अटकेची माहिती सोशल मीडियावर पसरताच आणखी तीन पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या हल्ल्यातील एका तरुणीने सांगितले की, कात्री लागताच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन ती रस्त्यावरच बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता, त्याने जीन्सच्या आत दोन लोअर घातल्याचे समोर आले. जन्मापासून पाय बारीक असल्याने ते जाड दिसावेत म्हणून आपण असे कपडे घालत असल्याचे त्याने सांगितले. आरोपीने काही काळ पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT











