Chandrashekhar Azad हल्ला! चार जणांना ताब्यात, घटनेचे फोटो आले समोर

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची गाडी सहारनपूर येथून जप्त, चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले

The attackers came in a Haryana number car. The bullet came out after touching Chandrashekhar's back.

The attackers came in a Haryana number car. The bullet came out after touching Chandrashekhar's back.

मुंबई तक

29 Jun 2023 (अपडेटेड: 29 Jun 2023, 04:20 AM)

follow google news

chandrashekhar azad ravan latest news : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांची कार जप्त केली आहे. चार संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

हे वाचलं का?

एक दिवस आधी (28 जून) सहारनपूरमधील देवबंदला पोहोचलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या प्राणघातक हल्ल्यात चंद्रशेखर जखमी झाले असून त्यांना देवबंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 

चंद्रशेखर हे त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून देवबंद दौऱ्यावर पोहोचले होते. त्यानंतर अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळी त्यांच्या पाठीला स्पर्श करून गेली, त्यामुळे ते जखमी झाले. त्यांच्या गाडीवरही गोळ्यांच्या खुणा दिसत होत्या.

हेही वाचा >> कल्याण लोकसभा मतदारसंघावर हक्क कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

हल्लेखोर हरयाणाची पासिंग असलेल्या कारमधून आले होते. चंद्रशेखर यांच्या पाठीला स्पर्शून गोळी निघाली. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गोळीबारात त्यांच्या गाडीच्या काचाही फुटल्या. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

 

हा हल्ला झाला तेव्हा चंद्रशेखर दिल्लीहून घरी परतत होते. त्याचदरम्यान देवबंदमध्ये त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. पाठीमागून आलेल्या वाहनातून मागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. एकूण चार राऊंड गोळीबार करण्यात आला.

हेही वाचा >> Pune Crime: ‘आज एक तरी मर्डर करतोच..’, पुणे कोयता हल्ल्याची Inside Story

भीम आर्मीच्या प्रमुखांनी हल्ल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘मला नक्की आठवत नाही, पण माझ्या लोकांनी त्यांना ओळखले. त्यांची गाडी सहारनपूरच्या दिशेने गेली. आम्ही यू-टर्न घेतला. घटनेच्या वेळी माझ्या लहान भावासह आम्ही पाच जण गाडीत होतो.’

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या वाहनाचा क्रमांकही समोर आला. हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या छोट्या कारमधून आल्याचे सांगण्यात आले. तर ज्या वाहनाचा क्रमांक सांगितला गेली, ती स्विफ्ट डिझायर कार आहे.

कोण आहेत चंद्रशेखर आझाद?

चंद्रशेखर आझाद हे वकील आणि दलित-बहुजन हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी आहेत. ते आंबेडकरवादी, भीम आर्मीचे सह-संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये टाईम मासिकाने 100 उदयोन्मुख नेत्यांच्या वार्षिक यादीत त्यांचा समावेश केला होता. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 3 डिसेंबर १९८६ रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील छुटमुलपूर शहरात झाला.

हेही वाचा >> ‘दारू पिऊ नका..’ म्हणताच BJP नेत्याकडून बायकोची हत्या, बंदूक उचलली अन्…

भीम आर्मीची स्थापना 2014 मध्ये चंद्रशेखर आझाद, सतीश कुमार आणि विनय रतन सिंह यांनी केली होती. ही संस्था शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील दलितांच्या मुक्तीसाठी काम करते. 2019 मध्ये, त्यांनी वाराणसीतून मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याची योजना आखली होती, परंतु नंतर त्यांनी सपा/बसपा युतीला पाठिंबा देऊन माघार घेतली. आझाद यांनी दलित आयकॉन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

    follow whatsapp