भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेनेतला वाद पुन्हा एकदा उफाळून वर आला आहे. वाशिम दौऱ्यावर असलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमय्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून या हल्ल्याविषयी माहिती दिली.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या यांच्या ताफ्यातील एका गाडीवर शाईफेकही झाली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. या कारखान्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या आज वाशिमच्या दौऱ्यावर होते. मात्र शिवसेनेकडून सोमय्या यांच्या दौऱ्याला विरोध होत होता. भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकारानंतर किरीट सोमय्यांनी त्याच ठिकाणी न थांबता पुढे निघून जाणं पसंत केलंय. परंतू या प्रकारानंतर घटनास्थळी जमावाने मोठी गर्दी केली. पोलिसांना अखेरीस या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जचा वापर करावा लागला. भावना गवळी यांच्या कारखान्यावर केलेल्या आरोपांवरुन हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय. किरीट सोमय्या यांच्यासोबत गाडीत भाजप आमदार राजेंद्र पाटणी देखील होते. त्यामुळे या प्रकरणावरुन आता येणाऱ्या काळात दोन्ही पक्ष पुन्हा एकदा समोरा समोर येणार असं दिसतंय.
Narayan Rane येऊन गेल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण
ADVERTISEMENT











