नो-पार्किंगमध्ये पार्क केलेली बाईक पोलिसांनी चालकासह उचलली, Pune पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

आपल्या दुचाकी किंवा चारचाकी असं कोणतंही वाहन असेल तर ते चालवताना किंवा रस्त्यात पार्क करताना नियमांचं पालन करावं लागतं. नो-पार्किंग एरियात पार्क केलेली गाडी उचलून घेऊन जाण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना दिलेला आहे. परंतू ही कारवाई करताना पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा मनमानी कारभार दिसून आला. गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील नाना पेठ परिसरात एक दुचाकी नो-पार्किंगमध्ये पार्क केली […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:26 AM • 20 Aug 2021

follow google news

आपल्या दुचाकी किंवा चारचाकी असं कोणतंही वाहन असेल तर ते चालवताना किंवा रस्त्यात पार्क करताना नियमांचं पालन करावं लागतं. नो-पार्किंग एरियात पार्क केलेली गाडी उचलून घेऊन जाण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना दिलेला आहे. परंतू ही कारवाई करताना पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा मनमानी कारभार दिसून आला.

हे वाचलं का?

गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील नाना पेठ परिसरात एक दुचाकी नो-पार्किंगमध्ये पार्क केली होती. वाहतूक पोलिसांचं एक पथक यावेळी तिकडे आलं असता त्यांनी ही गाडी टो करायला सुरुवात केली. परंतू चालकाच्या हे लक्षात येताच तो लगेच आपल्या बाईकवर येऊन बसला. यानंतर गाडी टो करणारे कर्मचारी आणि दुचाकीच्या मालकात चांगलाच शाब्दीक वाद रंगला. चालक दुचाकीवरुन उतरायला तयार नाही म्हणल्यावर वाहतूक पोलिसांच्या पथकाने चालकासह गाडी टो करत त्याला पोलीस स्टेशनपर्यंतची सफर घडवली.

दरम्यान या चालकाने वाहतूक पोलिसांचा आरोप फेटाळला आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे मात्र संध्याकाळी नाना पेठ भागात बघ्यांची चांगलीच गर्दी झाली. प्रत्येक जण हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी धडपड करत होता. ज्यामुळे या भागात काही काळासाठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रीया येत आहेत. चालकाने गाडी नो-पार्किंगमध्ये पार्क केली असली तरीही कारवाई करताना हा प्रसंग टाळता येऊ शकला असता अशी प्रतिक्रीया सोशल मीडियावर पहायला मिळते आहे.

सोशल मीडियावर या कारवाईचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे.

    follow whatsapp