"सुनेत्रा पवारांना मला राज्यसभेवर पाठवायचं होतं, पण 'ती' अट.."

Navneet Rana on Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना मला राज्यसभेवर पाठवायचं होतं..पण ती एक अट आडवी आल्याचं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलय.

Navneet rana

Navneet rana

मुंबई तक

09 Jun 2026 (अपडेटेड: 09 Jun 2026, 03:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुनेत्रा पवारांना मला राज्यसभेवर पाठवायचं होतं

point

पण 'ती' अट आडवी आली

Navneet Rana, अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यसभेची संधी दिली. नवनीत राणा यांचा पत्ता कट कशामुळे झाला? राष्ट्रवादीच्या बैठकीत ऐनवेळी राजेंद्र जैन यांचं नाव पुढे का आलं? याबाबतची कारणं समोर आली आहेत. याबाबत स्वत: नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्ट करत खुलासा केलाय. त्या काय म्हणाल्या?  जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

हेही वाचा : सोलापूर विधानपरिषद : राजेंद्र राऊत खिंडीत अडकले? आता ते नेते काट्याने काटा काढणार?

नवनीत राणा यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी 

आधुनिक भारताची उभारणी करणारे भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब निर्भीड व कणखर गृहमंत्री मा. अमितजी शहा साहेब व महाराष्ट्राचे कार्यसम्राट व जननायक मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे. करिता मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिक पणे करीत राहील. आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्या बाबत विनंती केली होती, मात्र अपरिहार्य कारणास्तव ते शक्य झाले नाही.

हेही वाचा : Astrology : जून ते ऑगस्ट महिन्यात 'या' राशींना पैसा मिळेल, काय सांगतं राशीभविष्य?

आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. मात्र, राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेवरून मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. तरीदेखील माझ्यावर विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार व पार्थदादा पवार यांची आभारी आहे.