मुंबई तक
अक्षय केळकर 'बिग बॉस मराठी 4' चा विजेता ठरला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि 'बिग बॉस मराठी'चे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी विजेता म्हणून अक्षय केळकरच्या नावाची घोषणा केली.
स्पर्धेच्या सुरुवातीला बझर राऊंडमध्ये राखी सावंत बाहेर पडली. तिने मोठी हिंमत करुन ९ लाख रुपये घेतले आणि बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
बझर राऊंडमध्ये राखी सावंत बाहेर पडल्यानंतर नवा टास्क सुरु झाला होता. या टास्कमध्ये अमृता धोंगडे आऊट झाली.
राखी सावंत आणि अमृता धोंगडे बाहेर पडल्याने स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अशातच किरण माने यांनाही स्पर्धेतून निरोप देण्यात आला.
त्यामुळे आजच्या दिवशी टॉप 2 मध्ये अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर राहिले होते.
शेवटी अक्षय केळकरने बाजी मारत बिग बॉस मराठी 4 ’च्या ट्रॉफीवर नावं कोरलं आहे.