जेनेलिया डिसुझा-रितेश देशमुख : ९ वर्ष डेट केल्यानंतर केलं लग्न, अशी आहे 'लव्हस्टोरी'

मुंबई तक

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सून आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा तिच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते.

जेनेलिया डिसुझा सोशल मीडियावर सक्रिय असते. वयाच्या १६व्या वर्षीच जेनेलियाने अभिनयात पदार्पण केलं होतं.

जेनेलिया डिसुझा सुरुवातीला अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या जाहिरातीमध्ये झळकली होती.

१६व्या वर्षी जेनेलिया डिसुझाने तुझे मेरी कसम सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. योगायोग म्हणजे रितेश देशमुखनेही याच चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलेलं आहे.

जेनेलिया डिसुझा-रितेश देशमुख यांची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखीच आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांची पहिली भेट विमानतळावर झाली होती.

रितेश देशमुखला भेटण्यापूर्वी जेनेलियाच्या मनात त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वेगळीच कल्पना होती. मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यानं तिच्या मनात रितेशबद्दल वेगळी प्रतिमा होती.

रितेश देशमुख हा अहंकारी असेल, पण जेव्हा तुझे मेरी कसम सिनेमात काम करताना तिच्या मनातील रितेशबद्दलची प्रतिमा पूर्णपणे बदलून गेली.

तुझे मेरी कसम सिनेमाच्या सेटवर मैत्री झाल्यानंतर दोघे एकमेकांच्याजवळ येत गेले. दोघांनी तब्बल ९ वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर २०१२ मध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझाने लग्न केलं.

लग्न झाल्यानंतर दोन वर्षानंतर जेनेलिया डिसुझाने मुलाला जन्म दिला. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव रिआन असं आहे. त्यांना आता दोन मुलं आहेत.

मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणं सगळ्यात चांगलं असतं, असं जेनेलिया डिसुझाचं मत आहे. पण नशीबाने जेनेलिया डिसुझा चित्रपटसृष्टीत आली.

Instagram

जेनेलिया डिसुझा फुटबॉलपटू म्हणूनही खेळली आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)