Jio च्या 'या' प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रचंड फायदा

मुंबई तक

टेलिकॉम ऑपरेटर्स एअरटेल, जिओ आणि Vi ने टॅरिफ हाइकनंतर काही प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत.

आता जिओने एक नवा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.

या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा आणि दुसरे फायदे मिळणार आहे.

जिओचा नवा प्रीपेड प्लॅन एअरटेलच्या 2999 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहे.

या प्रीपेड प्लॅनची किंमत 3000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.

यामध्ये दररोज 2.5 जीबी डेटा देण्यात येतो याशिवाय या प्लॅनमध्ये 100 SMS देण्यात आले आहेत.

या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये डेटा बेनिफिटशिवाय जिओ मार्ट आणि जिओच्या दुसऱ्या सेवाही देण्यात आल्या आहेत.