गणपती बाप्पाला का वाहतात दुर्वा?

मुंबई तक

गणपतीच्या पुजेमध्ये दुर्व्याला अनन्य साधारण महत्व असतं.

दुर्वा गणपती बाप्पाला फारच प्रिय आहे. याशिवाय गणपती बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते.

गणपती बाप्पाला पुजेमध्ये 21 दुर्वांची जुडी अर्पण केली जाते.

जाणून घेऊयात गणपती बाप्पाच्या पुजेमध्ये दुर्वा नेमकी का वापरली जाते.

पौराणिक कथेनुसार, अनलासूर नावाचा एका दैत्याने सगळीकडे उच्छाद मांडला होता.

कोणीही काही केल्या या दैत्याचा वध करु शकत नव्हतं.

अनलासुराच्या छळाला त्रस्त होऊन सर्व देव गण हे अखेर गणपती बाप्पाकडे गेले.

तेव्हा गणपती बाप्पाने अनलासुराचा थेट गिळून वध केला.

असं म्हटलं जातं की, अनलासुराला गिळून बाप्पाने त्याचा वध केला पण त्यानंतर बाप्पाच्या उदरात जळजळ होऊ लागली.

हीच जळजळ शांत करण्यासाठी ऋषी-मुनींनी बाप्पाला दुर्वा खाण्यास दिलं.

दुर्वा खाल्ल्यानंतर गणपती बाप्पाच्या पोटातील जळजळ शांत झाली.

तेव्हापासूनच गणपती बाप्पाला दुर्वा फारच प्रिय समजली जाऊन लागली आणि पुजेमध्ये त्याचा वापर होऊ लागला.

लक्षात, असू द्या की, पुजेसाठी जर आपण दुर्वा घेत असाल तर तो स्वच्छ जागेतून घ्यावा.

दुसरी गोष्ट अशी की, दुर्वा लांब आणि स्वच्छ असली पाहिजे.

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या पुजेसाठी दुर्वा आणायला अजिबात विसरु नका.