'त्या' फोटोवरून चित्रा वाघ भडकल्या, ठाकरेंच्या महिला नेत्याला सुनावलं

मुंबई तक

नागपुरात क्रीडा महोत्सव झाला. यातील एका फोटोवरून चित्रा वाघांना लक्ष्य केलं गेलं.

उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांना चित्रा वाघांनी विरोध केलाय.

त्याचा उल्लेख न करता आमदार मनिषा कायंदे यांनी एक फोटो ट्विट केला.

त्यात नितीन गडकरी एका महिला शरीरसौष्ठवपटूला पुरस्कार देत आहेत.

त्याखाली लिहिलंय की भाजपच्या चित्रा वाघांना हा नंगाटनाच मान्य आहे का?

त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, 'मनिषा कायंदे ताई, शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला.'

'खासदार क्रीडा महोत्सव घेणारे नितीन गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत, शरीरसौष्ठव स्पर्धेचे असो.'

'कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे?' अशी टीका चित्रा वाघांनी केली.