मी काही वर्ष शिक्षणमंत्री म्हणूनही काम केलंय, इतकं अवघड काम कोणतंही नाही -शरद पवार

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यातील विविध शाळांमधील ग्रंथालयांसाठी पुस्तके वितरित करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत सुमारे ३३०० शाळांना १० कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके ग्रंथालयांसाठी भेट देण्यात येणार आहेत.

विविध क्षेत्रातील विचारवंतांची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. यातून वाचनसंस्कृती वाढावी हे अपेक्षित आहे.

विधिमंडळ सदस्यांच्या निधीचा योग्य वापर करायचा एक आदर्श कार्यक्रम विक्रम काळे यांनी हाती घेतला आहे.