'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा...', अंधारेंकडून कंगना, अमृता फडणवीसांचे फोटो शेअर

मुंबई तक

शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी उर्फी जावेद प्रकरणावरुन थेट काही फोटो पोस्ट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला

(फोटो सौजन्य: Facebook)

मी साडी नेसते, मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं: सुषमा अंधारे

(फोटो सौजन्य: Facebook)

पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो.: सुषमा अंधारे

(फोटो सौजन्य: Facebook)

प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदा. टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही: सुषमा अंधारे

(फोटो सौजन्य: Facebook)

अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया: सुषमा अंधारे

(फोटो सौजन्य: Facebook)

जर पेहरावावरुन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी?: सुषमा अंधारे

(फोटो सौजन्य: Facebook)

(फोटो सौजन्य: Facebook)उर्फीसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?: सुषमा अंधारे

(फोटो सौजन्य: Facebook)

उर्फीच्या वेशभूषेवरच आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना, केतकी किंवा अमृता फडणवीसांच्या वेशभूषेवर घ्याल का?: अंधारे

(फोटो सौजन्य: Facebook)

नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी टीका केली आहे.

(फोटो सौजन्य: Facebook)