मुंबई तक
सध्या पृथ्वी टीम इंडियातून बाहेर आहे.
पृथ्वी शॉची भारत विरूद्ध श्रीलंका टी-20 सीरीजमध्ये निवड करण्यात आलेली नाही.
या सर्वात न्यू इयर सेलिब्रेशनवेळी पृथ्वी शॉ चर्चेत आला आहे.
पृथ्वीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी टाकली त्यात तो एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे.
ही मिस्ट्री गर्ल एक अभिनेत्री आहे, तिचं नाव निधी रवी तपाडिया आहे.
पृथ्वीच्या फॅन्सने या सर्व चर्चेवर अनेक प्रश्न उपस्थित केले, ही तुझी नवीन गर्लफ्रेंड का? असेही विचारले.
निधी तपाडिया ही अनेक म्यूझिक व्हिडीओ, सीआयडी आणि काही चित्रपटांमध्ये दिसली आहे.