अभिमानास्पद! जगात 10 द्विशतकवीर अन् त्यातील 7 भारतीय!

मुंबई तक

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील पहिले द्विशतक झळकावले.

शुभमन गिलपूर्वी ४ भारतीय फलंजादांनी द्विशतक ठोकले आहे. सचिन तेंडूलकरने २०१० मध्ये एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा द्विशतक झळकावले होते.

सचिननंतर विरेंद्र सेहवागने २०११ मध्ये २१९ धावा करतं वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

त्यानंतर २०१३ साली रोहित शर्माने २०९ धावांसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक झळकावले आहे.

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांसह पुन्हा एकदा २०१४ मध्ये द्विशतक झळकावले होते.

रोहितने शर्माने पुन्हा २०१७ मध्ये २०९ धावा करत तिसरे द्विशतक केले.

इशान किशनने डिसेंबर २०२२ मध्ये बांग्लादेशविरुद्ध २१० धावांची खेळी केली आहे.