मुंबई तक
मुंबई-गोवा महामार्गावर आज (19 जानेवारी) दोन भीषण अपघात झाले.
पहिल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहेत.
पहिला अपघात ट्रक आणि इको कारचा तर दुसरा अपघात खासगी बसचा झाला आहे.
माणगाव तालुक्यातील गोरेगाव हद्दीत इको कारचा भीषण अपघात झाला.
मुंबईकडे जाणारा ट्रक आणि मुंबईकडून गुहागरकडे जाणारी इको कार यांची जोरदार धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की, त्यात ईको गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातामध्ये इको गाडीतील पाच पुरुष व तीन महिला व दोन लहान मुलांचा अशा एकूण 10 जणांचा जागीच मृत्यू झाला.
दुसरा अपघात हा पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा असून तो हळवल फाटा येथे झाला.
या अपघातात 4 ठार तर तब्बल 23 अन्य प्रवासी जखमी झाले आहेत.
चालकाचा ताबा सुटून बस पलटी झाली. यातच चार जणांचा मृत्यू झाला.