विधान परिषदेत उद्धव ठाकरेंचे विरोधकांवर 7 वार!

मुंबई तक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत भाषण करताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

(फोटो सौजन्य: Facebook)

'सभापती महोदय मी आपल्याला एक पेन ड्राइव्ह देणार आहे. काय आहे विरोधी पक्षात गेल्यावर पेनड्राइव्ह यायला लागतात.'

(फोटो सौजन्य: Facebook)

'तुम्ही लाठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होत्या. आता तुम्ही सीमा पार करुन दुसरीकडे गेलात.'

(फोटो सौजन्य: Facebook)

'दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधान, गृहमंत्र्यांना आपलं नेता मानतात...'

(फोटो सौजन्य: Facebook)

'मी काही उगाच सांगणार नाही. मी बाबरीच्या आंदोलनात होतो, या आंदोलनात होतो.. मग गोळ्या कशा जाताना पाहिल्या..'

(फोटो सौजन्य: Facebook)

'ते मुख्यमंत्री बोलतायेत. पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी या विषयावर काढलाय का?'

(फोटो सौजन्य: Facebook)

'ठराव करणार असाल तर चर्चाचर्वणं करु नका, ते चिंगम चावल्यासारखं तोंड हलवल्यासारखं करुन थट्टा करण्याची गरज नाहीए.'

(फोटो सौजन्य: Facebook)

'मला अजूनही कर्नाटकातील मंत्री सापडलेला नाही की, जो म्हणालाय की, महाराष्ट्रात जन्म घ्यावा. पण दुर्दैवाने आपले मंत्री कर्नाटकात जाऊन बोललेत की, जन्म घ्यावा तर कर्नाटकात घ्यावा.'

(फोटो सौजन्य: Facebook)