मुंबई तक
तान्या नावाची 42 वर्षीय महिला मुलाच्या 24 वर्षीय मित्राच्या प्रेमात पडली आहे.
तान्याला 24 वर्षीय जोसूनेही स्वीकारलं आणि दोघंही गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
लोकांकडून या कपलवर खूप टीका केली जात आहे. जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा तान्या 39 आणि जोसू 21 वर्षांचा होता. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात.
गेल्या वर्षी दोघांचं लग्न झालं. 2018 मध्ये तान्याची 12 आणि 14 वर्षांची मुलं जोसूच्या घरी व्हिडीओ गेम खेळायला गेली असताना तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली.
लोकांनी या कपलला धमकीही दिली आहे. जर ते दोघं वेगळे झाले नाहीत तर त्यांच्याविरोधात सामाजिक सेवांची मदत घेतली जाईल.
तान्या आणि जोसूला या सर्व गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असं त्यांनी सांगितलं.
तान्या आणि जोसू त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. जिथे त्यांना ट्रोल केलं जातं.
काही लोक जोसूवर स्वत:च्या गरजेसाठी तान्याचा वापर केल्याचा आरोप करतात.
'लोकांनी काहीही म्हणू देत पण आम्ही दोघं नेहमी सोबत राहू' असं तान्या म्हणते.