दिवसाढवळ्या डोक्यात दगड घालून महिलेची हत्या, आरोपी कोण?

इम्तियाज मुजावर

सातारा जिल्ह्यातील तळबीड (ता. कराड) येथील एक वयोवृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

विमल कृष्णत चव्हाण (वय 70 वर्ष) रा. तळबीड (मानकर वस्ती) या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक फोटो

दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने मानकर वस्ती, तळबीड व एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रातिनिधिक फोटो

तसेच या घटनेमुळे येथील महिलांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

प्रातिनिधिक फोटो

या हत्येची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याच्य जयश्री पाटील व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

प्रातिनिधिक फोटो

आता पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

प्रातिनिधिक फोटो