मुंबई तक
मुंबईत एका व्यक्तीची टीव्ही चॅनल सर्व्हिसच्या नावावर फसवणूक झाली आहे.
टीव्ही चॅनल चेकिंगमध्ये फॉल्ट सांगून एक अॅप डाऊनलोड करायला सांगण्यात आलं. त्यानंतर आर्थिक गंडा घालण्यात आला आहे.
पीडित व्यक्तीने 14 जानेवारी रोजी टीव्ही चॅनल सर्व्हिस प्रोव्हाईडरला कॉल केला होता.
फोनवर बोलत असताना दुसरा कॉल आला आणि कॉलरने त्यांना Anydesk अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं.
या अॅपच्या माध्यामाने आपल्या डिवाईसचा अॅक्सेस दुसऱ्या व्याक्तीला देण्यासाठी केला जातो. सर्व्हिसला रिमोट पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी कंपनी या अॅपचा वापर करत असते.
अॅक्सेस मिळतात स्कॅमर्सने संबधित व्याक्तीच्या खात्यातून 5 लाख रुपये गायब केले.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित व्याक्तीने पोलीसात तक्रार केली आहे. त्याची एक चुक पाच लाख रुपयांचा चुना लावून गेली.