मुंबई तक
ठाणे वाहतूक शाखेचा निषेध म्हणून एका युवकाने आज टोईंग व्हॅन खाली झोपून आंदोलन केलं.
एकीकडे टोईंग व्हॅन आणि दुसरीकडे शहरात कोणत्याही प्रकारची पार्किंग सुविधा उपलब्ध नाही, असा आरोप या तरुणाने केला.
संगम डोंगरे असं या आंदोलन केलेल्या युवकाचं नावं आहे.
पूर्वी पी १ पी २ (सम व विषम तारखांना) पार्किंग करणाऱ्यांची पद्धत देखील बंद केली आहे.
याबाबत वारंवार पत्र व्यवहार करून देखील वाहतूक शाखा काहीच उत्तर देत नाहीत, असा आरोप या युवकाने केला.
याचं सगळ्याचा निषेध करत संगम डोंगरे या युवकाने नौपाड्यातील मुख्य चौकात टोईग व्हॅन खाली झोपून आंदोलन केले.