मुंबई तक
मॉडल आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्सर फेनिला फॉक्स हिच्या सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
29 वर्षीय फेनिला, मोबाइलचा अतिवापरामुळे तिला आता व्हिलचेअर वापरावी लागत आहे.
फेनिला दिवसभरात 14 तास मोबाइल वापरायची. यामुळे ती फोन अॅडिक्ट झाली होती.
2021 मध्ये फेनिला जेव्हा पोर्तुगालमध्ये राहत होती, तेव्हा तिला डोकेदुखी आणि मानदुखी सुरू झाली.
सुरूवातीला डॉक्टरांना तिच्या आजाराबाबत निदान झालं नाही. नंतर तिची तब्येत बिघडू लागली. अशात ती पोर्तुगालवरून ब्रिटनला पोहोचली.
यादरम्यान, तिच्या डोळ्यांसमोर अंधार येणं आणि इतर समस्या निर्माण झाल्या. यामुळे तिला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला.
पुढे तिची आरोग्य तपासणी केली असता तिला सायबर सिकनेस हा आजार असल्याचं निदान झालं.
फेनिला दिवसभरात 14 तास मोबाइलचा वापर करायची आणि हिच गोष्ट तिला महागात पडली.
सायबर सिकनेसच्या अवस्थेत माणूस कायमचं भान हरपू शकतो.
सध्या फेनिलावर उपचार सुरू आहेत आणि ती मोबाइलपासून लांब आहे. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्सही आहेत.