मुंबई तक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान आज ५८ वर्षांचा झाला.
अमीर खान हा एकमेव असा अभिनेता आहे ज्याची व्यावसायिक आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं.
वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत दोन लग्न होऊनही अमीर खान आज सिंगल लाईफ जगत आहे.
अमीर खानच पहिलं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. दोघेही एकमेकांवर भरपूर प्रेम करत होते. पण १६ वर्षांच्या संसारानंतर दोघांचही नातं तुटलं.
त्यानंतर अमीरच्या आयुष्यात किरण राव आली. दोघांनीही लग्न केलं. मात्र हे लग्नही १५ वर्षांच्या संसारानंतर तुटलं.
एका मुलाखतीमध्ये अमीर म्हणाला, मी कायमच माझ्या कामाला जास्त महत्व देत आलो. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं. मी त्यांना गृहीत धरत गेलो. त्यामुळेच दोन्ही लग्न तुटली असावीत.