मुंबई तक
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटल्या जाणाऱ्या आमिर खानची मुलगी इरा ही नुकतीच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरे सोबत एंगेज झाली. ते दोघे मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
बॉयफ्रेंड नुपूर शिकरेने इराला अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये इटलीत प्रपोज केले होते.
इराच्या एंगेजमेंटची बातमी व्हायरल होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
सेलिब्रिटी मित्रांपासून ते चाहत्यांनीही आयराला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका साध्या कुटुंबातील नुपूर एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि सल्लागार आहे.
नुपूर बऱ्याच दिवसांपासून इराला प्रशिक्षण देत आहे. एवढेच नाही तर नुपूरने आमिर खानलाही प्रशिक्षण दिले असून 2008 पासून सुष्मिता सेनला प्रशिक्षण देत आहे.