काही लोकांना वाटतं माझं देशावर प्रेम नाही असं का म्हटला आमिर खान?

मुंबई तक

#BoycottLalSingChaddha या ट्रेंडवर आमिर खानने त्याची भूमिका मांडली आहे

सर्व फोटो सौजन्य-आमिर खान, इंस्टाग्राम पेज

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून हा ट्रेंड सुरू आहे, त्यावर आता आमिर खानने त्याचं मत व्यक्त केलं आहे

आमिर म्हणतो एक सिनेमा तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, ती फक्त एका अभिनेत्याचीच नसते तर अनेक लोकांची मेहनत त्यामागे असते

सिनेमा रिलिज होण्याआधीच अशा काही गोष्टी सुरू केल्या जातात ज्या गोष्टींचा त्रास होतो

आमिर म्हणतो माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे, तसंच इथले लोकही मला खूप आवडतात

आमिर म्हणतो माझ्या देशातल्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो की माझ्या सिनेमावर बहिष्कार टाकू नका

आमिरने माझा सिनेमा सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहावा असंही आवाहन केलं आहे

आमिर खान हा एक गुणी अभिनेता आहे, त्याच्या विशेष सिनेमांसाठी तो ओळखला जातो

आमिरला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखलं जातं

आमिरने दंगल सिनेमात केलेला रोलही लोकांच्या अजून स्मरणात आहे

आमिरने केलेल्या भूमिका लोकांना आवडत असतात, मात्र तो हिंदू विरोधी आहे असा एक प्रचार केला जातो आहे

आमिरचा लालसिंग चढ्ढा हा सिनेमा ११ ऑगस्टला रिलिज होणार आहे, त्याआधीच बॉयकॉटलालसिंगचढ्ढा हा ट्रेंड सुरू झाला आहे, ज्यावर आमिरने नाराजी वर्तवली आहे