मुंबई तक
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर या टेम्पोचा अपघात झाला आहे.
अपघात झालेल्या टेम्पोत बुलढाणा व अकोला भागातील एकूण 40 मजूर कामगार होते.
रस्ते कामासाठी हे मजूर कामगार मराठवाड्यातून महाबळेश्वरला आले होते.
अपघातात अनेक जण जखमी आहेत आहेत, यात लहान मुलांचाही समावेश आहे.
काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातात दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा जिल्ह्यातील रूग्णालयात दाखल करण्यात येईल.
ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी सह्याद्री ट्रेकर्सचे जवान आणि ग्रामस्थ मदत कार्यात गुंफले.