अभिनेते विक्रम गोखले यांची एक्झिट : वाचा गाजलेल्या चित्रपटांची यादी

मुंबई तक

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनयाचा आणि संगीताचा जन्मजात वारसा लाभलेल्या या अभिनेत्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण केलं.

‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होय. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टर’, ‘दुसरा सामना’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘संकेत मिलनाचा’, ‘खरं सांगायचं तर’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘नकळत सारे घडले’ इ. नाटकांत मुख्य भूमिका केल्या.

‘शेवग्याच्या शेंगा’ या चित्रपटात गोखले यांनी पहिल्यांदा अभिनय केला. अनोळखी, माहेरची साडी, कळत नकळत यासोबतच कुंकू, मुक्ता, लपंडाव या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘वजीर’ (१९९४) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ अ‍ॅवॉर्ड मिळाले.

डॉक्टरी पेशावर आधारित कथेवर ‘आघात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना २०१३मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

खुदा गवाह, हम दिल दे चुके सनम, ‘भुलभुलैया,अग्निपथ, ईश्वर, सलीम लंगडे पे मत रो, मिशन ११ जुलै, सो झूठ एक, गफला या हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या.