पहिला सिनेमा फ्लॉप, नंतर ठरली सुपरहिट! कतरिनाबाबत 'या' गोष्टी ठाऊक आहेत?

मुंबई तक

अभिनेत्री कतरिना कैफचा आज वाढदिवस आहे, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे

सर्व फोटो-कतरिना कैफ, इंस्टाग्राम पेज

कतरिना कैफने बुम नावाच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला होता

कतरिना कैफने त्यानंतर बड्या स्टार्ससोबत काम केलं. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान या तिघांसोबतही कतरिनाने काम केलं. तिला चांगली पसंतीही मिळाली

कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या.

कतरिना आणि रणबीर कपूर हे दोघेही लिव्ह इनमध्ये राहात होते, मात्र या दोघांचं नंतर ब्रेक अप झालं.

कतरिना कैफने गेल्या वर्षी विकी कौशलसोबत विवाह केला. त्याआधी हे दोघे एकमेकांना डेट करत होते

जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमात ती ऋतिक रोशन सोबत झळकली होती. यातला तिचा रोलही प्रेक्षकांना आवडला होता

कतरिना कैफने अक्षय कुमार, रणबीर कपूर यांच्यासोबतही सिनेमांत काम केलं आहे.

कतरिना कैफ इंस्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय आहे, ती तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे