Urfi Javed : 'म्हणूनच उर्फी पूर्ण कपडे घालत नाही'... अखेर कारण आलं समोर

मुंबई तक

बिग बॉस फेम आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

तिच्या फॅशन बद्दल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तिच्याविरूद्ध तक्रार केली.

मुंबईच्या रस्त्यांवर नंगटपणा करत असल्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला.

मात्र उर्फीने ती पूर्ण कपडे का घालत नाही या मागचं कारणं स्पष्ट केलं.

उर्फी जावेदने सांगितले की, तिच्या शरीराला कपड्यांची अॅलर्जी आहे.

उर्फीने पूर्ण कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर तिला पुरळ उठतात. इंस्टा स्टोरीवर तिने याबाबत खुलासा केला आहे.