Women's IPL मध्ये Adani vs Ambani असा सामना पाहायला मिळणार, कसं?

मुंबई तक

महिला इंडियन प्रीमियर लीग (WIPL) चा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे.

पहिल्या सत्रात पाच संघ असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे पाचही संघ विकले आहेत, त्यामुळे बोर्ड श्रीमंत झाले आहे.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, लखनौ आणि दिल्ली हे पाच संघ प्रवेश करतील.

अदानी समूहाने अहमदाबादसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला मुंबईचा संघ इंडियाविन स्पोर्ट्सने विकत घेतला आहे, ती रिलायन्स ग्रुपची कंपनी आहे.

बीसीसीआयने अद्याप महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु अहवालांवर विश्वास ठेवला तर, ही स्पर्धा यावर्षी 4 ते 26 मार्च दरम्यान आयोजित केली जाऊ शकते.

पहिल्या सत्रात 22 सामने होण्याची शक्यता आहे. हे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत.

चॅम्पियन संघाला 6 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला 3 कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संघाला एक कोटी रुपये दिले जातील.