मुंबई तक
मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत आणि राधिकाचा साखरपुडा त्यांच्या राहत्या घरी अँटेलियात पार पडला.
अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याला दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही मुलगी आराध्यासह अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याला उपस्थित होती.
यावेळी, माय-लेकींचा (ऐश्वर्या-आराध्या) ग्लॅमरस लूक हा पाहण्यासारखा होता.
आराध्या बच्चनने ऑफ व्हाईट आणि काळ्या रंगाचा सूट घातला होता, त्यावर सिलव्हर रंगाची जरी होती.
आराध्याने जरीचे नक्षीकाम असलेल्या सूटवर हीरे जडित दागिनेही घातले होते.
आराध्याने तिच्या हेवी सूटवर सिंपल आणि सोबर मेकअप केला होता, ज्यामुळे ती सुंदर दिसत होती.
तसंच, ऐश्वर्याचा रॉयल लूकही खूपच सुंदर होता. ज्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.
ऐश्वर्याने हिरव्या रंगाचा सूट घातला होता, त्यावर गोल्डन वर्क असलेलं नक्षीकाम होतं.
ऐश्वर्याने तिच्या सूटवर साजेसा असा न्यूड मेकअप लूक केला होता, ज्यामुळे ती रॉयल दिसत होती.
नंतर, माय-लेकींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून ग्रीन कार्पेटवर पॅपराजीला पोझ दिल्या.