मुंबई तक
बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन टॅक्स न भरल्याने चर्चेत आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्याच्या तहसीलदारांनी ऐश्वर्या राय बच्चन तिच्या जमिनीवरील उर्वरित कर जमा न केल्याने नोटीस पाठवली आहे.
ऐश्वर्याची नाशिकच्या सिन्नर येथील आडवाडी शिवारात जमीन असल्याचे वृत्त आहे.
या जमिनीसाठी एक वर्षाचा कर शिल्लक आहे, तो 21,960 रुपये आहे. ऐश्वर्याने तो कर भरला नाही.
या थकबाकीमुळे तहसीलदारांनी ऐश्वर्या रायविरोधात नोटीस बजावली आहे. तिला 9 जानेवारी रोजी नोटीस बजावली होती.
तहसिलदारांनी बजावलेली नोटीस तिला प्राप्त झाली की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.
ऐश्वर्यासोबतच अन्य १२०० मालमत्ताधारकांनाही कर थकबाकीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.