'कुठे गेला डंका, कुठे गेली चोट', अजित पवारांनी केली सदावर्तेंची मिमिक्री

मुंबई तक

एसटी कर्मचाऱ्यांचे पगारांना विलंब झाल्यानं अजित पवारांनी सरकार टीकेची झोड उठवली.

यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्तेंवर सडकून टीका केली.

अजित पवार म्हणाले, 'सरकार असताना आम्ही पगार कपात केला नाही. उशीरा दिला नाही.'

'एसटी संपाच्या वेळी आमचं सरकार असताना ही शहाणी काही आमदार तिथं जाऊन झोपत होते.'

'घोषणा देत होते. एकतर म्हणायचा डंके की चोट पे करूंगा. डंका कुठे गेला आणि चोट कुठे गेली काय माहिती?'

'आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. जबाबदार कोण आहे?', असा सवाल अजित पवारांनी केला.