मुंबई तक
बिग बॉस मराठीच्या सीझन 4 चा विजेत्याच्या नावाची घोषणा झाली.
5 फायनलिस्टमधून एकाच्या नावाची घोषणा विजेता म्हणून करण्यात आली.
अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने यंदा ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते.
शेवटच्या फेरीत 2 फायनलिस्टमधून विजेता निवडण्यात आला.
अक्षय केळकरने भरघोस मतं मिळवत विजेतेपद आपल्या नावावर केलं.
अक्षयने बिग बॉस मराठी सीझन 4 ची ट्रॉफी आणि लाखो रुपयांचं बक्षीस जिंकलं.
त्याला 15 लाख 55 हजार रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.