रणबीर कपूरसोबतच्या नात्यावर आलिया भट्टचं विधान, अभिनेत्री म्हणाली....

मुंबई तक

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणारा ब्रह्मास्त्र चित्रपट कमाईच्या बाबतीत २०० कोटींच्या पुढे गेलाय.

२०२२ हे वर्ष आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसाठी खूपच चांगलं राहिलं आहे.

आलिया-रणबीरने लग्न केलं. त्यांचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असून, आता दोघे लवकरच आईबाबा होणार आहेत.

अलिकडेच आलिया भट्टने रणबीर कपूरसोबतच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलंय.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्ट म्हणाली, "रणबीर आणि माझ्यातील नातं खूप घट्ट आहे."

पुढे बोलताना आलिया भट्ट म्हणाली "आम्ही 'दो जिस्म एक जान' टाइप नाही आहोत."

"आम्हा दोघांनाही अभिनयाबद्दल वेड आहे आणि त्यामुळे आमच्यात वेगळं बॉण्डिग आहे", असंही आलिया भट्ट म्हणाली.

याच मुलाखतीत रणबीर आलिया भट्टबद्दल म्हणाला, "ती (आलिया भट्ट) कधी कधी खूप वरचढ होते आणि इन्स्टाग्रामसाठी फोटोशूट करायला लावते, जे माझ्यासाठी खूपच अवघड काम आहे. मात्र, ती सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेते."

आलिया भट्ट फोटो/इन्स्टाग्राम