Amala Paul : अभिनेत्रीला हिंदू मंदिरात जाण्यापासून रोखलं, कारण...

मुंबई तक

दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.

अभिनेत्री अमाला पॉलला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं.

केरळमध्ये एर्नाकुलममधील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात अधिकाऱ्यांनी अमालाला प्रवेश करू दिला नाही.

धार्मिक भेदभाव झाल्याचा आरोप करत अमाला पॉलने संताप व्यक्त केला आहे.

मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तिला सांगितलं, 'मंदिर परिसरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे.'

अमाला म्हणते, 'प्रवेश न मिळाल्याने मंदिरासमोर उभं राहूनच दर्शन घ्यावं लागलं.'

'धार्मिक कारणं देत मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं', असंही ती म्हणाली.

मंदिरातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ' इतर धर्माचे लोक मंदिरात येत नाही असं नाहीये, पण सेलिब्रिटी आल्यावर खूप वाद होतो.'