Kolhapur: अंबाबाईची भाज्यांमध्ये बांधली विशेष पूजा, पाहा मनमोहक रुप

मुंबई तक

कर्नाटकातील बदामी इथली बनशंकरी म्हणजेच शाकंभरी देवी अनेकांची कुलदेवता आहे.

30 डिसेंबरपासून शाकंभरी नवरात्रीला सुरूवात झाली आहे.

शाकंभरी नवरात्राच्या निमित्तानं कोल्हापुरातील श्री अंबाबाईची विशेष पूजा बांधण्यात आली होती.

शाकंभरी देवीनं स्वत:च्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या उत्पन्न करून, दुष्काळ पडलेल्या प्रांतातील भाविकांना जीवनदान दिलेलं.

शाक म्हणजे भाजी, म्हणूनच ज्या देवीनं भक्तांना अन्नस्वरूप जीवन दिलं, ती शाकंभरी अशी धारणा आहे.

शाकंभरी देवीच्या मूळ क्षेत्रामध्ये म्हणजे बदामीमध्ये विविध प्रकारची भाजी वापरून पूजा बांधली जाते.

तशीच पूजा कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही आज बांधण्यात आली होती.