"अदाणी-अंबानींनी मोठंमोठे नेते विकत घेतले, पण..." -प्रियांका गांधी

मुंबई तक

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात दाखल झालीये.

यानिमित्ताने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी एकत्र दिसले.

प्रियांका गांधी म्हणाल्या, "भाऊ माझ्याकडे बघ, मला सर्वात जास्त अभिमान तुझा आहे."

"सत्तेच्या माध्यमातून ताकद लावली गेली, कोट्यवधी रुपये खर्च केले, प्रतिमा हनन करण्यासाठी"

"त्याच्याविरुद्ध तपास यंत्रणा लावल्या गेल्या. माझा भाऊ योद्धा आहे, योद्धा", असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

"अदाणी-अंबानींनी मोठमोठे नेते विकत घेतले, पण माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाही", असं विधान प्रियांका गांधींनी यावेळी केलं.