मुंबई तक
उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने अमेरिकेतील एका अंतराळ कंपनीच्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
फ्लोरिडा येथील कॉम्प कॅनावेरल स्पेस स्टेशनवरून SpaceX च्या Falcon 9 रॉकेटमधून उपग्रह सोडण्यात आला.
या खासगी अंतराळ कंपनीचे नाव मोमेंटस इंक असे आहे.
हा उपग्रह इंधनविना चक्क पाण्यावर उडणारा आहे. हे आश्चर्याचे आहे.
उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत तैनात करण्यात आलं आहे. त्याचे सोलर पॅनल्स उघडल्याने उपग्रह त्यांच्यापासून ऊर्जा बनवून त्याच्या बॅटरी चार्ज करतात.
व्हिगोराइड-5 उपग्रहाचे भविष्यात अनेक फायदे होणार आहेत. जुने उपग्रह दुरुस्त करण्याचेही काम याद्वारे करता येईल.