Amitabh Bachchan : सौदीत बिग बी कुणाला भेटले?

मुंबई तक

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

पॅरिस सेंट जर्मन आणि रियाध इलेव्हन या दोन संघात सामना रंगला.

क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले.

लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मनचं, तर क्रिस्टियानो रोनाल्डोने रियाध सीझन इलेव्हनचं नेतृत्व केलं.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील सामन्यासाठी हजर होते.

यावेळी अमिताभ बच्चन यांनी सर्व फुटबॉल स्टार प्लेयर्सची हातमिळवून भेट घेतली.

अमिताभ बच्चन यांनी सर्वात आधी लिओनेल मेस्सीसह पॅरिस सेंट जर्मन टीमची भेट घेतली.

नंतर क्रिस्टियानो रोनाल्डोसह रियाद सीजन इलेव्हन टीमची भेट घेतली.