Anant Ambani: अनंतचं वजन 'यामुळे' वाढतं, नीता अंबानींनी सांगितलं कारण

मुंबई तक

अनंत अंबानींचा साखरपुडा

मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींचा गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत नुकताच साखरपुडा पार पडला.

instagram

अनंत अंबनींचे वजन वाढले

साखरपुडा सोहळ्यातील समोर आलेल्या फुटेजमध्ये अनंत अंबानी यांचे वजन वाढलेले दिसत होते.

instagram

108 किलो वजन केलेलं कमी

2016 मध्ये, अनंत यांनी वजन कमी करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कारण त्यांनी 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केलेलं.

instagram

2020 मधील व्हिडिओ

यानंतर 2020 मध्ये राधिका मर्चंटच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये अनंतचे वजन पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळालेले.

instagram

पुन्हा वाढलं वजन

डिसेंबर 2022 मध्ये, ईशा अंबानींच्या जुळ्या मुलांचे स्वागत करताना, अनंत अंबानी दिसून आले होते. त्यावेळी त्यांचं बरंच वजन वाढल्याचं पाहायला मिळालेलं.

instagram

नीता अंबानींनी सांगितलं कारण

2017 मध्ये एका मुलाखतीदरम्यान नीता अंबानी यांनी सांगितले होते की, अनंत यांना अस्थमा आहे, त्यामुळे त्यांना भरपूर स्टेरॉईड्स देण्यात आले होते.

instagram

208 किलो होते वजन

स्टेरॉईड्समुळे त्यांचे वजन पुन्हा वाढले. रिपोर्टनुसार, यापूर्वी अनंतचे वजन सुमारे 208 किलो होते.

instagram

अनेक मुले लढत आहेत लठ्ठपणाशी

नीता अंबानी पुढे म्हणाल्या, 'अशी अनेक मुले आहेत ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे. माझ्या मते पालकांनी आपल्या मुलांना वजन कमी करण्यास प्रवृत्त केले पाहिजे.'

instagram

नीता अंबानी गेलेल्या लॉस एंजेलिसला

नीता अंबानी म्हणाल्या होत्या, 'मी आणि अनंत मुलांचा लठ्ठपणा कमी करणाऱ्या लॉस एंजेलिसल येथील रुग्णालयातही गेलो होतो.'

instagram

व्यायाम

नीता अंबानी यांनी सांगितले होते की, 'अनंत रोज पाच-सहा तास व्यायाम करत असे. ज्यामध्ये 21 किमी चालणे, योगासने आणि इतरांचा व्यायामांचा त्यात समावेश होता.'

instagram